Dr. Santosh Gandhi
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसीही विद्यार्थ्यांचे मूल्य आधारित शिक्षण, समाजाभिमुख संशोधन, तसेच तांत्रिक कौशल्यासह व्यक्तिगत सर्वांगीण विकासाकरता झटणारी नावाजलेली संस्था आहे.
प्राचार्य डॉ. अश्विनी माडगुळकर यांचे खंबीर नेतृत्व, उच्च पदवीधारक शिक्षकवर्ग, अद्ययावत उपकरणांनी युक्त प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण पद्धती यामधून शैक्षणिक गुणवत्ता राखत असताना शिक्षणेत्तर उपक्रमांच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देणे, उच्च शिक्षणाकरिता मार्गदर्शन करणे, आपले भवितव्य घडविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षण या प्रक्रियेतील स्तंभ/आधार मानणे, त्यांचीपण प्रगतिसाधणे व कर्मचाऱ्यांची आपुलकीने काळजी घेणारी संस्था म्हणून संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाला याचा अभिमान आहे.
श्री डॉ. संतोष विलासचंद गांधी प्राध्यापक, औषध निर्माण रसायनशास्त्र विभाग May 25, 2020