NSS Special Camp News 2025-26

हिवरेत एआयएसएसएमएसफार्मसीचे हिवाळी शिबिर२०२५२०२६

सवित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीस सेवा योजना अतंर्गत व त्याअनुषंगाने हिवरे (ता. पुरंदर) येथे पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या विदयार्थ्यांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर पार पाडले. २० ते २६ डिसेंबर, २०२५ या कालावधीत हे शिबिर झाले.
सात दिवसांच्या शिबिरादरम्यान हिवरे गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. गावाचे सर्वेक्षण, मंदिराची स्वच्छता, सरकारी रुग्णलयाच्या साहाय्याने आरोग्य तपासणी करण्यात आली.
सायबर सुरक्षा, आनापान साधना शिबिर, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा मोठया उत्साहात पार पाडल्या. तसेच हिवरे गाव सासवड रोड याठिकाणीच्या ऐतिहासिक शिव मंदीराच्या आवारात बकुळ सोनचाफा, कदंब अशा सुमारे १५ रोपटयाचे वक्षारोपण करण्यात आले. विदयार्थ्यांच्या श्रमदान, पाणलोट व बंधरा व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, जनसेवा राष्ट्रभक्ती, समूहभान, एकजुटता समयसूचकता या आणि अशा अनेक गुणांचा विकास या शिबिरादरम्यान झाला. या शिबिराचे आयोजन महाविदयालयातील रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेंन्द्र गजबे, प्रा. गौतम गुंदेचा आणि प्रा. शुभांगी देशपांडे यांनी केले. शिबिरास सरपंच सौ. शोभा शांताराम दळवी, उपसरपंच श्री. रामदास कुदळे, माजी सरपंच सौ. भारतीताई गुलाब गायकवाड, माजी सरपंच श्री. संदीप लिंभोरे, श्री. शब्बीर भाईशेख यांनी मोलाचे सहाय्य केले. हिवरे गावच्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता रायडू, व मुख्याध्यापक मा. श्री. रविन्द्र कुंजीर, एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी आर. माडगूळकर व एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

हिवरे येथे आयोजित श्रम संस्कार शिबिरात सहभागी झालेले एआयएसएसएमएसचे विदयार्थी / विदयार्थ्यांनी